श्रीरामपूर जलसंपदा पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारत येथे शासकीय आढावा मिटींगला आले असता त्यांना श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित दुकानदाराचे पुनर्वसन करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करताना सुभाष त्रिभुवन म्हणाले की श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड बेलापूर रोड गोंधवणी रोड पोलीस स्टेशन समोरील नेहरू मार्केट समोरील विविध व्यवसाय करून आपली उपजीविका भागवणाऱ्या व्यापाऱ्या च्या दुकानावर श्रीरामपूर नगर परिषदेने बुलडोझर फिरून त्यांना बेरोजगार केले आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून मंत्री महोदय आपण लवकरात लवकर त्यांचे पुनर्वसन करावे अशी विनंती केली त्यानंतर मंत्र विखे पाटील म्हणाले की श्रीरामपूर शहरात एस टी महामंडळाची फार मोठी जागा उपलब्ध असून त्या जागेमध्ये गाळे बांधून विस्थापित व्यापाऱ्यांना गाळे देण्याचा विचार आहे त्यासाठी येत्या आठ दिवसात श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी एस टी महामंडळाचे अधिकारी तसेच विस्थापित व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक येत्या आठ दिवसात घेऊन विस्थापितांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढणार आहे असे गौरवोद्गार मंत्री विखे पाटलांनी काढले त्यावेळी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले एसटी महामंडळाच्या जागेत गाळे बांधून पुनर्वसन करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे तोपर्यंत विस्थापित व्यापाऱ्यांना रोजी रोटीचा प्रश्न सोडवण्यासाठीआहे त्या जागेवर पाच फुटाची जागा देऊन त्यांच्या तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात यावे फार झाले तर विस्थापित व्यापारी स्टॅम्प पेपरवर श्रीरामपूर नगर परिषदेत कालावधीचा वेळ लिहून देतील त्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सहमती दर्शवली आता लवकरच विस्थापित व्यापाऱ्यांचे पुनर्वसनाचे स्वप्न साकार होणार आहे यात तीळ मात्र शंका नाही
येत्या आठ दिवसात मुख्याधिकारी विस्थापितांची व्यापाऱ्यांची बैठक घेऊन पुनर्वासनाचा प्रश्न निकाली काढणार विखे पाटील
न्युज लक्षवेधी
0
टिप्पणी पोस्ट करा