Top News

श्रीरामपूर पोलिसांचा वाळू तस्करांना दणका; एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या कारवायांत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर पोलिसांचा वाळू तस्करांना दणका; एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या कारवायांत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त


श्रीरामपूर प्रतिनिधी-

श्रीरामपूर तालुका परिसरात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी शनिवारी (दि. २४) जोरदार प्रहार केला. गोदावरी नदीपात्रातून चोरटी वाहतूक करणारा एक टिप्पर आणि एक ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला असून, एकूण ९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.


पहिली कारवाई: माळवाडगाव परिसरात ७ लाखांचा टिप्पर जप्त

पहाटे ६:३० च्या सुमारास माळवाडगाव रस्त्यावरील अडबंगनाथ संस्थान कमान परिसरात पोलिसांनी सापळा लावला. यावेळी विनापरवाना वाळू घेऊन जाणारा टाटा कंपनीचा टिप्पर (क्र. MH 17 CV 1095) पकडण्यात आला.

 * मुद्देमाल: ७ लाख रुपयांचा टिप्पर आणि १५ हजार रुपयांची २ ब्रास वाळू.

 * आरोपी: सुनील छगन रजपुत (वाहेगाव मांजरी), सागर भाऊसाहेब आसणे (माळवाडगाव) आणि वाहन मालक ज्ञानेश्वर देविदास बनसोडे (भामाठाण).

 * सहभागी पोलीस पथक पोकॉ. सतिश पठारे, पोकॉ.अनिल शेंगाळे, पोकॉ.सचिन शेळके, पोकॉ.अनिकेत बर्डे आणि पोकॉ. आयुब बाबु शेख.

दुसरी कारवाई: मातुलठाण शिवारात ट्रॅक्टरवर छापा

सकाळी ९:३० च्या सुमारास मातुलठाण गावातील खंडोबा मंदिराजवळ पोलिसांनी दुसरी कारवाई केली. यावेळी विना क्रमांकाचा स्वराज ट्रॅक्टर आणि ट्रॉली पोलिसांनी हस्तगत केली.

 * मुद्देमाल: २ लाख रुपयांचा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि १० हजार रुपयांची दीड ब्रास वाळू.

 * आरोपी: चालक सागर कारभारी थोरात आणि मालक युवराज अशोक धनवडे (दोघे रा. पुणतांबा).

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल  सतिश पठारे, पोलीस कॉन्स्टेबल शंकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल अनिल शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेळके, पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत बर्डे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर ढोकणे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. डी. आगलावे आदींच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

या दोन्ही प्रकरणांत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३/१५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकाच दिवसात झालेल्या या दोन मोठ्या कारवायांमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने