Top News

रिपब्लिकन सेना पक्षाच्या शिर्डी लोकसभा क्षेत्र प्रमुख पदी - चरणदादा त्रिभुवन

 



शिर्डी | प्रतिनिधी
रिपब्लिकन सेना पक्षाच्या शिर्डी लोकसभा क्षेत्र प्रमुख पदी आयु. चरणदादा त्रिभुवन यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आयु. चरणदादा त्रिभुवन हे समाजकारणात सक्रिय असून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे व पक्षनिष्ठेमुळे त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

रिपब्लिकन सेना पक्षाचे नेते आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि शिर्डी लोकसभा क्षेत्रात संघटन मजबूत करण्यासाठी ते काम करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात पक्ष अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

👉 "आयु. चरणदादा त्रिभुवन यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!"

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने